सोलापूर / पुणे : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आमदार भालके यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉलच्या समोर उडाली आहे.
आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी अधिकृत माहिती आत्ता डॉक्टरांनी दिली. रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या तब्येतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले. भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पोस्ट कोव्हिड त्रासामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती घेतली. त्याचवेळी रूपाताई चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली. रात्री हॉस्पिटल सूत्रांने प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली. आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे सांगितले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी झाली आहे. पंढरपुरातून ही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉलच्या समोर उडाली दिसत आहे. प्रत्येकजण भालके यांच्या निरामयतेची आणि त्यांच्या सुखरूप परत देण्याची प्रार्थना करीत आहे.
दरम्यान भारत भालके यांना काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास आहे. कालपासून त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे समजते. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.