मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशातील नवीन फिल्मसिटीची घोषणा केली आहे. बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला. उलट आम्ही नवीन सुविधांसह फिल्मसिटी बांधत आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बॉलिवूडमधील काही जणांशी चर्चा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की मी इथून काही घेऊन जायला आलेलो नाही तर अत्याधुनिक सुविधा असलेली फिल्मसिटी निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बॉलिवूडला सुरक्षित वाटले पाहिजे अशी इंडस्ट्री निर्माण करणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशातील नवीन फिल्मसिटीची घोषणा केली आहे. बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला. उलट आम्ही नवीन सुविधांसह फिल्मसिटी बांधत आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बॉलिवूडमधील काही जणांशी चर्चा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की मी इथून काही घेऊन जायला आलेलो नाही तर अत्याधुनिक सुविधा असलेली फिल्मसिटी निर्माण करुन रोजगाच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बॉलिवूडला सुरक्षित वाटले पाहिजे अशी इंडस्ट्री निर्माण करणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.