मंगळवेढा : साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पाटखळ-खुपसंगी मार्गावर सिमेंट टँकर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. गोविंद बुरुंगे आणि चिल्लपा बुरुंगे अशी मृताची नावे आहेत. या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेली माहिती अशी की, गोविंद आणि चिल्लपा हे दोघे खोमनाळ हिवरगाव येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याला गेले होते. ते परत बुरुंगेवाडीकडे येत असताना पाटखळ गावाजवळ त्यांच्या दुचाकीला सिमेंट वाहून नेणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली.
धडक इतकी भयंकर होती की, गोविंद आणि चिल्लपा जवळपास 20 फूट अंतरावर फेकले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.