नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार 2 हजार रुपयांचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सातवा हप्ता 10 डिसेंबर, 2020 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.
या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत हप्ते शेतक-यांना पाठविण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* तीन हप्त्यांमध्ये वर्ग
पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांसी लिंक असणं आवश्यक आहे.
* त्रुटी असल्यास पैसे येणार नाहीत
सातव्या हप्त्याचा लाभ 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकर्यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत, कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्डची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावामध्ये गडबड असल्यानं पैसेदेखील थांबवण्यात आलेले आहेत.