पंढरपूर : वादग्रस्त तहसीलदार वैशाली वाघमारे यांची पुणे जिल्ह्यातील खेड येथे बदली झाली आहे. याबाबत शुक्रवारी उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. पंढरपूरला नवीन तहसीलदार कोण येणार याबाबत आणखी आदेश नाहीत. माञ चंद्रपुर येथील निलेश गौंड यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गौंड यांच्या नियुक्तीला पालकमंञी अनुकूल असल्याची माहिती आहे.
वैशाली वाघमारे यांच्या कार्यकाळात अवैध वाळूने डोके वर काढले आहे. राजकीय पक्षासह अनेक संघटनांनी बदलीची मागणी केली होती. दिवंगत आमदार भारत भालके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर. आर. पाटील लोक विकास प्रतिष्ठानने या तहसीलदारांच्या बदलीची मागणी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तहसीलदार या आमदारांसह राजकीय नेते, पञकारांचे फोन देखील उचलत नसल्याच्या थेट तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या होत्या. वाघमारे या ठेकेदारांबरोबर अर्थपूर्ण संबंध ठेवत अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा दंड वसुल करीत नाहीत. यामुळे शासनाचा महसूल बुडून आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रार देखील महसूलमंञ्याकडे केली होती. याबाबत पुणे विभाग महसूल उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी कार्यवाही करण्याचे ८ आॅक्टोबर रोजी आदेश दिले होते.