कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. यानंतर त्यांनी एका सभेत बोलताना भाजपावर हल्ला चढवला. भाजपाने बंगालमध्ये ३० जाग जिंकून दाखवाव्यात, असं त्यांनी खुले आव्हान दिलं आहे.
“भाजपाने २९४ जागांचं स्वप्न नंतर पाहावं, अगोदर ३० जागाच जिंकून दाखव्यावत” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यांवरूनही त्यांनी यावेळी निशाणा साधला. भाजपा नेते दर आठवड्याला येतात पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवण करतात. मात्र दाखवतात असं की जसं आदिवासीच्या घरी जेवण करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच, “आम्ही वर्षाचे ३६५ दिवस गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या सोबत आहोत. मात्र भाजपा दररोज खोटे व्हिडिओ पसरवून समाजात तेढ निर्माण करत आहे. जी लोकं महात्मा गांधी आणि देशाच्या अन्य महापुरुषांचा सन्मान करत नाहीत. ते ‘सोनार बांगला’ बनवण्याच्या गप्पा मारत आहेत.” असा टोला ममता बॅनर्जींनी भाजपाला यावेळी लगावला.
“काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही(भाजपा) काही आमदारांना विकत घेऊ शकतात, मात्र तृणमूल काँग्रेसला नाही विकत घेऊ शकत.” असं सांगून ममता बॅनर्जींनी भाजपा केंद्रीय संस्था व पैशांच्या बळावर बंगालमध्ये घुसू इच्छित आहे, मात्र त्यांना यामध्ये यश येणार नसल्याचं सांगितलं.