यवतमाळ : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार , विधानसभा प्रमुख संतोष ढवळे , महेश पवार यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
खासदार भावना गवळी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे प्रकरणी असे आरोप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जबाब दो आंदोलन करण्यात आलं. मात्र, यावेळी पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले असता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याला शिवसेना घाबरणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे कंपनी देत नाही, तोपर्यंत आम्ही कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेत आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार भावना गवळी यांनी सांगितलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतोनात नुकसान झालं. मात्र, विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात, यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. मात्र, यावेळी मॅनेजरनं समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्याचा राग आल्यानं संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे हा प्रकार खासदार भावना गवळी यांच्यासमोरच घडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.