मुंबई : सरत्या वर्षाच्या अखेरीस एका नावाजलेली कंपनीचा मोठा आर्थिक सौदा झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाने त्रस्त असलेली जनता करत असताना एक जुनी आणि स्मार्टफोन बाजारात अस्तित्वासाठी धडपडणारी मोठी सोनी कंपनी मायक्रोसॉफ्टने
विकत घेतली आहे. हा सौदा 130 अब्ज डॉलरचा झाला आहे. सोनी ही जपानी कंपनी आहे.
मायक्रोसॉफ्टने वर्षाचे दोन दिवस शिल्लक असताना ही कंपनी विकत घेतली आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट आता मनोरंजनाच्या व्यवसायातही उतरणार आहे. या डीलसोबत सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील काम आदी आता मायक्रोसॉफ्टचे झाले आहे. एवढेच नाही तर व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेले आहे. मायक्रोसॉफ्ट सध्या प्लेस्टेशन ५ ची विक्री सुरुच ठेवणार आहे. आता त्यांची टीम एक्सबॉक्स सोनीचे सर्व कंटेंट एक्सबॉक्समध्ये आणण्याची तयारी करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचबरोबर सोनी म्युझिक आणि सोनी पिक्चर्सवर मायक्रोसॉफ्टची वेगळी योजना आहे. नवीन सबस्क्रिप्शन सेवांमध्ये बदल करणे ही ती योजना आहे. या सेवा ग्रूव म्यूजिक अँड मूवीज अँड टीवी एप्स सोबत जोडण्यात येणार आहे. यासाठी एका कंपनीने एक अॅपमध्ये सर्व प्लॅटफॉर्ममध्ये बदल केला जाणार आहे. किंमत ही स्पॉटिफायसारखी ठेवली जाणार आहे. तर मुव्हीज आणि टीव्हीच्या सेवा नेटफ्लिक्ससारख्या असणार आहेत.
* मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनी आधीच घेतली विकत
या डीलचा फायदा एक्सबॉक्सच्या ग्राहकांना होणार आहे, कारण त्यांना सोनीचे प्लेस्टेशनवरील गेमदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यांना स्पायडरमॅन आणि दी लास्ट ऑफ अस असे पॉप्युलर गेम खेळता येणार आहेत. या डीलमध्ये सोनीचा स्मार्टफोन बाजारही आहे. तो सध्या सोनीच्या व्हिडीओ आणि साऊंड उत्पादनांमध्ये येतो. मायक्रोसॉफ्टने आधीच नोकिया कंपनी विकत घेतली आहे.
मायक्रोसॉफ्टला नोकियाच्या व्यवहार नंतर तोट्याचा ठरला होता. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले की, आता तसे होणार नाही. यावेळी कंपनीने गुगल आणि मोटरोलामध्ये जसा करार झालेला तशीच रणनीती आखली आहे.