वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात 4 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात काहीजण जखमीही झाले आहेत. ट्रम्प व त्यांचे समर्थक राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल मान्य करण्यास तयार नाहीत. तर अमेरिकन काँग्रेसमध्ये जो बायडन यांच्या विजयावर अखेरचा शिक्कामोर्तब होणार आहे.
अमेरिकेत काल बुधवारी मोठा हिंसाचार झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मान्य करण्यास नकार देत व निकाल रद्द करावा, अशी मागणी करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाखो समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला केला.
कॅपिटल बिल्डिंगमधील काचा फोडल्या. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येथे 2700 पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे. आम्ही कधीही हार मानणार नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान ट्रम्प यांचे लाखो समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी तोडफोड केली. ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला. ट्विटर सुरक्षा टीमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स मागे घेत नाहीत, किंवा डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन कॅपिटल भवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली होती. समर्थक आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार झटापट झाली.
कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वॉशिंग्टनच्या नॅशनन मॉलमध्ये आपल्या समर्थकांशी संवाद साधला होता. निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
याच्या काही तासांनंतरच अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीबाहेर आणि आत हिंसाचाराला सुरुवात झाली आणि ट्रंप यांनी एका नव्या व्हीडिओ संदेशाद्वारे आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला.
तर या व्हीडिओमध्ये निवडणूक विषयक दावे करण्यात आले असल्याने आपण तो हटवत असल्याचं युट्यूबने म्हटलंय.
ट्विटरवरून हा व्हीडिओ सुरुवातीला काढून टाकण्यात आला नव्हता. पण हा व्हीडिओ रिट्वीट, लाईक आणि त्यावर कॉमेंट करण्याचा पर्याय बंद करण्यात आला होता. पण नंतर ट्विटरवरूनही हा व्हीडिओ हटवण्यात आला.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि संसद भवनात मोठा धुडगूस घातला. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.
जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.जवळपास चार तास ही झटापट सुरु होती. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केलं आहे’ असं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील, असंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं. पोलीस आपल्या बाजूने आहेत. आपला पक्ष कायद्याने चालणारा आहे, मला कुठलाही हिंसाचार नको, असं ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटलं.
* बायडन यांच्याकडून शांततेचं आवाहन
संविधानाचं रक्षण करत अमेरिकेत उफाळलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय वाहिनीवरुन समर्थकांना शांततेचं आवाहन करावं, असं वक्तव्य अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी केलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रंप समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
बायडन म्हणाले, लोकशाही अप्रत्यक्षरित्या धोक्यात सापडली आहे. मी राष्ट्रपती ट्रंप यांना अपील करतो, त्यांनी टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करत लोकशाहीचं रक्षण केली पाहिजे. कॅपिटलमध्ये जबरदस्तीने घुसून खिडक्या तोडणं, प्लोअरवर येणं आणि गोंधळ करणं याला विरोध नाही हिंसाचार म्हणतात.
* ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक
कॅपिटॉल बिल्डिंगमधल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट लॉक केलंय. तर सर्मथकांना आवाहन करणारा त्यांचा व्हीडिओही काढून टाकण्यात आलाय. तर इव्हांका ट्रंप यांनी हिंसक समर्थकांना देशभक्त म्हणणारं ट्वीट नंतर डिलीट केलं.
निवडणुकीविषयी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट्समुळे त्यांचं अकाऊंट 12 तासांसाठी लॉक करण्यात करण्यात आलंय. त्यामुळे आता पुढचे 12 तास ट्रम्प यांना ट्वीट करता येणार नाही.
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे.
* ट्रम्प यांचा व्हीडिओ हटवला
या कारवाईसोबतच ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबवरून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा एक व्हीडिओ काढून टाकण्यात आलाय. आंदोलकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार केल्यानंतर ट्रंप यांनी त्यांच्यासाठी एक संदेश दिला होता. समर्थकांनी घरी परतावं असं आवाहन त्यांनी यात केलं होतं, पण सोबतच निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याच्या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला होता. या व्हिडिओमुळे हिंसाचार कमी होण्याऐवजी तो वाढेल अशी शक्यता असल्याने आपण हा व्हीडिओ काढून टाकत असल्याचं फेसबुकने म्हटलंय.