नवी दिल्ली : जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव आला आहे. मात्र आज इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यात पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. यात कोरोना काळात वाढवलेल्या उत्पादन शुल्कात कपात केली तर 5 रुपयांनी इंधन स्वस्त होऊ शकते. मात्र यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल, असं मंत्रालयाचे मत आहे. दरम्यान, असे झालेच तर सामान्यांना दिलासा मिळू शिकतो.
सार्वजनिक क्षेत्रातील तेलकंपन्या इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव केले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर आज शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झाले नाही आहेत.
दरम्यान रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या किंमतींपासून सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, उत्पादन शुल्क कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्रालयाच्या मते कोरोना काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्याने कपात केली तरी देखील पेट्रोलचे दर 5 रुपयांपर्यंत प्रति लीटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढवलं होतं. मंत्रालयाने असं म्हटलं आहे की उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल.
* महानगरांमधील आजचे इंधन दर
> दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये, डिझेल 74.38 रुपये लीटर > मुंबई- पेट्रोल 90.83 रुपये, डिझेल 81.07 रुपये लीटर > कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये, डिझेल 77.97 रुपये लीटर
> चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये, डिझेल 79.72 रुपये लीटर
> बंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये, डिझेल 78.87 रुपये लीटर
> नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये, डिझेल 74.82 रुपये लीटर
> गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये लीटर
* पहा तुमच्या शहरातील इंधनदर
तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून हे दर जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.