नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढवणारी बातमी आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू रविंद्र जाडेजा व रिषभ पंत यांना सिडनी कसोटीत दुखापत झाली आहे.
दोघांनाही स्कॅनसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे, बीसीसीआयने ही माहिती दिली. अचानक उसळी घेणाऱ्या चेंडूमुळे दोघांनाही त्रास झाला. जडेजाच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. या दोघांची जखम गंभीर असल्यास भारतीय संघासाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पुन्हा मोठा झटका बसला. सिडनी कसोटीत भारत बॅकफूटवर असतांना दुखापतीमुळे रवींद्र जडेजा मालिकेतून बाहेर झाला आहे. जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण त्याने फलंदाजी केली होती. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. जडेजाऐवजी मयंक अगरवाल दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करत आहे.