नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड करण्यात आले. यामागे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असणाऱ्या विजया गड्डे यांची महत्वाची भूमिका आहे. 45 वर्षीय विजया या ट्विटरमध्ये मोठ्या पदावर कामाला असून ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विजया या ट्विटरच्या कायदेशीर, धोरणांविषयी तज्ज्ञ आणि कंपनीच्या प्रोडक्टच्या सुरक्षा आणि विश्वासर्हतेशी संबंधित प्रमुख आहेत.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड करण्यामागे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असणाऱ्या विजया गड्डे यांची महत्वाची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. ४५ वर्षीय विजया या ट्विटरमध्ये मोठ्या पदावर कामाला असून ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पहिल्यांदा सस्पेंड केलं. मागील काही महिन्यांपासून ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विट्सवर आणि ट्विटर अकाऊंटवर विशेष लक्ष ठेवलं होतं. ट्रम्प यांचे अनेक ट्विट हे फ्लॅग म्हणजेच या ट्विटमधील दावा खरा आहेच असं नाही अशापद्धतीने मार्क केली जायची. मात्र शेवटी अमेरिकन संसदेमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपनीने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी ट्विटरवरुन हिंसा करणाऱ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना हिंसेसाठी प्रोत्साहन दिल्याचं ट्विटरने म्हटलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्विटरच्या कायदेशीर, धोरणांविषय तज्ज्ञ आणि कंपनीच्या प्रोडक्टच्या सुरक्षा आणि विश्वासर्हतेशी संबंधित प्रमुख असणाऱ्या विजया यांनी ट्विटरवरुन कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिक हिंसा पसरवण्याची शक्यता असल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. आम्ही आमची धोरणं, उद्दीष्ठ आणि सविस्तर विश्लेषण येथे देत आहोत. आमचा निर्णय कसा झाला त्यासंदर्भात तुम्ही येथे वाचू शकता,” असं म्हणतं विजया यांनी ट्विटरच्या नियमांसंदर्भातील एक लिंक शेअर केली आहे.
भारतामध्ये जन्म झालेल्या विजया या अगदी लहान असतानाच आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांचे संपूर्ण बालपण टेक्सासमध्येच केलं. त्याचे वडील मेक्सिकोच्या आखातामध्ये असणाऱ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पामध्ये केमिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. विजया वयाने मोठ्या झाल्या तोपर्यंत त्यांचे कुटुंब अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात स्थायिक झालं. न्यू जर्सीमध्ये विजया यांनी आपलं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं.
कॉर्नेल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापिठामधून विजया यांनी कायदा विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विजया यांनी दहा वर्ष एका कायदेशीर सल्लागार म्हणून खासगी कंपनीसोबत काम केलं. अनेक स्टार्टअप कंपन्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम ही कंपनी करायची. २०११ साली विजया यांचा ट्विटरसोबतचा प्रवास सुरु झाला. कॉर्परेट वकील म्हणून विजया या अगदी सुरुवातीपासूनच पडद्यामागून काम करायच्या. ट्विटरसंदर्भात अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र मागील दशकभरामध्ये त्यांनी ट्विटरच्या धोरणांनी कायद्याशी सांगड घालून दिली.