मुंबई : धनंजय मुडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ‘या प्रकरणात मुंडे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे, आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही. चौकशी सुरु आहे, प्रकरण न्यायालयात सुरु आहे, मंत्रिमंडळात फेरबदलाची गरज नाही’, असे पाटील यांनी ठळकपणे स्पष्ट केले.
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे.
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* कोअर कमिटीच्या बैठकीत झाला निर्णय
रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली.
पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचं कळतं. धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हे बैठकीला उपस्थित होते.
* रेणू शर्मावरच तिघांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.
रेणू शर्मा या महिलेने मे 2018 ते जुलै 2019 दरम्यान सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी नामक अधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे छळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझवान यांच्यासोबत आधी मैत्री मग हॉटेलिंग आणि बरेच काही अनेक दिवस घडले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर या महिलेने रिझवान यांच्याविरुद्ध विनयभंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दाखल केली.