सोलापूर : जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी मतदान आज होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
५९० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२,२२५ उमेदवार आपली राजकीय शक्तीपणाला लावली आहे. यातूनच ५९० गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवता येत नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाड्या, पँनेल करून गावपातळीवर निवडणूक लढवली जाते.
मतदानप्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी याकरिता परिश्रम घेत आहेत. एकूण २,२९६ प्रभागात निवडणूक होत आहे. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवारदेखील महिला शक्तीचा जोर आजमावत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातील ६४२ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६४२ ग्रामपंचायतींसाठी सहा लाख २० हजार २२३ स्त्री मतदार व सहा लाख ६३ हजार १९६ पुरुष मतदार व इतर १७ असे मिळून एकूण १२ लाख ८६ हजार ४३१ मतदार आहेत. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात १२.५४ टक्के मतदान झाले होते. या पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, दुसऱ्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
* तालुकानिहाय झालेले मतदान असे (०१.३० वाजेपर्यंत)
करमाळा – ५२.१७ टक्के
माढा – ५०.८४ टक्के
बार्शी – ४९.९० टक्के
उत्तर सोलापूर – ५२.१२ टक्के
मोहोळ – ४०.६९ टक्के
पंढरपूर – ५१.६५ टक्के
माळशिरस – ४६.७० टक्के
सांगोला – ५४.७३ टक्के
मंगळवेढा – ५१.३९ टक्के
दक्षिण सोलापूर – ५२.५४ टक्के
अक्कलकोट – ५१.१९टक्के
एकूण -५०.१६ टक्के