Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पाणीपुरवठा योजनेसह सोलापुरातला कोणताच प्रकल्प रखडू देणार नाही, ठाकरे स्मारकासाठी ४ कोटींचा निधी

Surajya Digital by Surajya Digital
January 16, 2021
in Hot News, सोलापूर
11
पाणीपुरवठा योजनेसह सोलापुरातला कोणताच प्रकल्प रखडू देणार नाही, ठाकरे स्मारकासाठी ४ कोटींचा निधी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरात पूर्वभागात साकारणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४ कोटी रूपयांचा निधी लवकरच दिला जाईल अशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात केली. तसेच पाणीपुरवठा योजना, उड्डाणपूल, रस्ते विकास आदी प्रकल्प सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाचे असून भूसंपादनाअभावी कुठलेही प्रकल्प रखडू देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी येथील नियोजन भवनात महापालिकेच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्मारकाच्या निधीची घोषणा केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महापौर श्रीकांचन यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर महापालिका, तसेच जिल्ह्यातील विविध नगर परिषदा व नगर पंचायतींच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी, तसेच राज्यभरात लागू करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी शिंदे सोलापूर येथे आले होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत शिंदे यांच्यासमोर विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या प्रकल्पांसमोरील अडचणी मांडण्यात आल्या. प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर शिंदे यांनी सोलापूर-उजनी समांतर पाणीपुरवठा योजना, तसेच एनएचएआयने मंजुरी दिलेल्या दोन उड्डाणपुलांच्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी लागणारा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसमवेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

शिंदे म्हणाले की, कोव्हीडमुळे राज्याच्या उत्पन्नावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे निधी न मागता उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांचा शोध घ्यावा, कल्पक पर्याय वापरावे, तज्ज्ञांची मदत घ्यावी. आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी कन्स्ट्रक्शन टीडीआर किंवा एआर पॉलिसीचा वापर करावा, जेणेकरून महापालिकेला एक पैसाही खर्च न करता विकासकामे करता येतील.

तातडीच्या बाबींसाठी निश्चितपणे जमेल तितका निधी देऊ, असे स्पष्ट करतानाच काम सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेत ठराव मंजूर झाला आहे. पण महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने स्मारक उभा राहण्यासाठी अडचण येत असल्याची कैफियत सोलापुरातील नगरसेवकांनी बैठकीत मांडली. याची दखल घेत स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी तातडीने ४ कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

Tags: #पाणीपुरवठायोजनेसह #कोणताचाप्रकल्प #रखडूदेणारनाही #ठाकरेस्मारकासाठी #४कोटींचानिधी
Previous Post

सोलापुरात कंटेनरने आठ वाहनांना ठोकरत तिघांना चिरडले; कंटेनर चालकास बेदम मारहाण

Next Post

नैतिकतेची चाड अपेक्षित, धनंजय मुंडेंचा घ्या राजीनामा, अन्यथा सोमवारपासून राज्यभर आंदोलन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नैतिकतेची चाड अपेक्षित, धनंजय मुंडेंचा घ्या राजीनामा, अन्यथा सोमवारपासून राज्यभर आंदोलन

नैतिकतेची चाड अपेक्षित, धनंजय मुंडेंचा घ्या राजीनामा, अन्यथा सोमवारपासून राज्यभर आंदोलन

Comments 11

  1. vape Shop toronto Airport says:
    9 months ago

    Is the one stop shop for all vape Shop toronto Airport products.

  2. casino says:
    7 months ago

    I enjoy what you guys are up too. This type of clever work and reporting!
    Keep up the terrific works guys I’ve added you guys to my own blogroll.

  3. saran di sini says:
    7 months ago

    Everyone loves whаt you guys are usuallyy up too. This type of clever wotk and reporting!
    Keep up the terrific works guys I’ve yоu guys to our blogroⅼl.

    Feel free to sᥙrf to mmy site :: saran di sini

  4. the best zinc supplement says:
    7 months ago

    I must to go by and convince you I enjoy reading through your website. We appreciate you every one of your valuable tips.

  5. Herta Jenner says:
    6 months ago

    Undeniably imagine that that you said. Your favourite justification appeared to be at the internet the simplest thing to consider of. I say to you, I definitely get annoyed even as other people think about issues that they just don’t realize about. You controlled to hit the nail upon the top as smartly defined out the entire thing without having side-effects , other people could take a signal. Will probably be back to get more. Thanks

  6. Daria Amelung says:
    6 months ago

    Hello! I just now would choose to supply a enormous thumbs up with the great information you could have here within this post. I will be coming back to your blog site for additional soon.

  7. Armida Wisneski says:
    6 months ago

    It is the best time to make some plans for the future and it’s time to be happy. I have read this post and if I could I want to suggest you some interesting things or suggestions. Maybe you can write next articles referring to this article. I desire to read more things about it!

  8. graliontorile says:
    6 months ago

    I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

  9. Cheap Automatic watchesreplicas omega constellation irisintime replica watches review says:
    5 months ago

    764612 241407Im confident your publish and internet site is extremely constructed 343536

  10. zomenoferidov says:
    5 months ago

    F*ckin¦ remarkable things here. I am very satisfied to look your post. Thank you a lot and i am taking a look forward to contact you. Will you kindly drop me a e-mail?

  11. superhero leather jackets says:
    4 months ago

    Thank you so much for providing individuals with an extraordinarily splendid possiblity to check tips from here. It is often so pleasurable and also stuffed with fun for me personally and my office peers to search your web site more than three times a week to study the new things you have. Of course, I am actually astounded with all the surprising knowledge served by you. Certain 3 tips on this page are in fact the most impressive I have ever had.

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697