मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे सोपविण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या विमानतळात 26 टक्क्यांची भागीदारी असलेल्या केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्याला मंजुरी दिली आहे.
मुंबईचे विमानतळ याआधी जीव्हीके, एएआयसह अन्य दोन भागीदारांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे सोपविण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या विमानतळात २६ टक्क्यांची भागीदारी असलेल्या केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्याला मंजुरी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईचे विमानतळ याआधी जीव्हीके, एएआयसह अन्य दोन भागीदारांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीकडे होते. यांत जीव्हीकेची भागीदारी सर्वाधिक होती. पण जीव्हीके समूह आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच विमानतळात सुरुवातीपासून असलेले दोन महत्त्वाच्या भागीदारांनीही जीव्हीके समूहापासून फारकत घेतली. त्यावेळी जीव्हीकेने दुसरीकडून निधीचे उभारून विमानतळावरील स्वत:चा ताबा वाचवला.
दरम्यान, मागीलवर्षी या विमानतळाच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून जीव्हीकेला हे विमानतळ अदानी समूहाला विक्री करावेच लागले. या व्यवहारासंबंधीदेखील विविध स्तरावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. पण एएआयने अलिकडेच या व्यवहाराला हिरवा कंदिल दिला आहे.