सोलापूर : रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव घाटात चार- पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली आहे. हा दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सातारा स्थानकातून सोलापूरच्या दिशेने निघालेली एस.टी. बस (एम. एच. १३ एस. ८९७१) म्हसवडजवळ आली. येथे चालक आणि वाहकाने जेवण आटोपून बस पुढे आणली. घाटातून बस शेवटच्या वळणावर आली. अचानक झाडामागे लपलेले चार-पाच तरुण पुढे येत चालकाच्या दिशेने दगडफेक करून बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास म्हसवडनजीकच्या पिलीव घाटात दारोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये पंढरपूरहून सातार्याच्या दिशेने येणार्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रसंगावधान राखत चालकाने बस न थांबवता पुढे जोरात दामटली. घाटाखाली उतरताच वर निघालेल्या लोकांना थांबवून याची माहिती दिली. तसेच तत्काळ माळशिरस पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घाटाकडे घेतली. रस्ता रात्रीत पूर्ववत केला आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात एका मोटरसायकल चालकासह एसटीच्या काचा फुटून त्यातील प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच चालकही जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. माळशिरस व म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सातारा व सोलापूर परिसरात कोंबिंग ओपरेशन केले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारालाही या चोरट्यांनी थांबवून मारहाण केल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी सांगितली. या हल्ल्यात तोही जखमी झाल्याचे वृत्त असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.