मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रदेश सचिवपदीवर माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आज बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीची विभागीय बैठक मुंबई येथील भाजपा कार्यालयात आज बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी निलेश राणे यांच्यावर सोपवली होती. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी भाजपाचे अस्तित्व नगण्य होते. कार्यकर्त्यांची मजबूत फळीही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ३०१ जागा निवडून आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाने मिळविलेल्या उत्तुंग यशाची दखल म्हणून माजी खासदार निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.