सोलापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने आज शनिवारी नवल पेट्रोल पंप समोर सोलापूर येथे अनोखे प्रतीकात्मक “बैल के आगे बिन बजाना आंदोलन’ बैलासमोर पुंगी वाजवून जनतेच्या अडचणीशी काही देणेघेणे नसलेल्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात देशभरात रोजच आंदोलने चालू आहेत तरीही मोदी सरकारवर काहीच फरक पडत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक “बैल के आगे बिन बजाना आंदोलन’ करण्यात आले. ज्याप्रमाणे बैलासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही, त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पडत नाही, असेच दिसते आहे, म्हणून आज आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले, योगेश मार्गम, विवेक कन्ना, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, गोविंद कांबळे, धनराज गायकवाड, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश लोंढे, जावेद कुरेशी, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, शरद गुमटे, अभिषेक गायकवाड, मनोहर माचर्ला, सतीश संगा, शिव कोरे, रोहन गायकवाड, लखन सुरवसे, अभिषेक बंटी गायकवाड, शरद वाघमोडे, अजय अवजुर, भारत करगुळे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.