पुणे : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य मंहामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली.
हे संमेलन नाशिक येथे 26 ते 28 मार्च दरम्यान होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज रविवारी अध्यक्ष पदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे ही नावं चर्चेत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अखेर डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव निश्चित करण्यात आले. जयंत नारळीकर यांनी विज्ञानकथा तसेच अनेक विज्ञानविषक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तर राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
26 मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथ दिंडीने या संमेलनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ठाले – पाटील यांनी दिली.