नांदेड : प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील एकूण ५ मुलांची निवड झाली आहे. त्यात नांदेडच्या कंधार तालुक्यातील घोडज येथील १४ वर्षीय कामेश्वर जगन्नाथ वाघमारे याचाही समावेश आहे. २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मनार नदीला पूर आला होता. या नदीत वाहून जाणाऱ्या तिघांपैकी दोघांना कामेश्वरने बाहेर काढलं होतं. पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आपल्या जिवाची पर्वा न करता दोन मुलांचा जिव वाचविणार्या घोडज येथील कामेश्वर वाघमारेची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडे केला होता पाठपुरावा.
कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवासी असलेला धाडसी बालक कामेश्वर वाघमारे (वय १३) यांनी ऋषी महाराज मठाजवळील मन्याड नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात तिन शाळकरी मुले बुड़त असताना पाहिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कामेश्वरने आपल्या जिवाची पर्वा न करता बुडत असलेल्या ओम विजय मठपती (१६ वर्ष), गजानन विश्वनाथ श्रीमंगले ( १४ वर्ष ), अजित कोंडीबा दुंडे (वय १४ वर्ष) या मुलांना वाचवण्यासाठी मन्याड नदीत उडी घेऊन दोघांना मोठ्या ध्यैर्याने वाचवण्यात यश मिळाले होते. परंतु ओम मठपती या बालकास वाचवण्यात अपयश आले होते.
त्याच्या या धाडसी व जिगरबाज कार्याची दखल लोहा- कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली व कामेश्वर वाघमारेचा त्यावेळी आ. शिंदे यांनी सत्कार करुन कौतूक केले होते. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्हाधिकारी यांना भेटून कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी वेळोवेळी आ. शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर केली होती.
पाठपुरावाला अखेर यश आले असून केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने 22 जानेवारीच्या पत्रकान्वये घोडज येथील धाडसी कामेश्वर वाघमारेला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार घोषीत केला असल्याने लोहा- कंधार मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.