नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. मद्य आणि तत्सम पेय (बिअर) आदींच्या किंमतीमध्ये अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल शंभर टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांनुसार, मद्य आणि मद्ययुक्त पेयांच्या किंमतीत वाढ होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही क्षेत्रांना मदतीचा हात देण्यात आला आहे तर काही गोष्टी महाग होणार आहेत. या अर्थसंकल्पाने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. मद्य आणि तत्सम पेय (बिअर इत्यादीं)च्या किंमतीमध्ये अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नागपूर आणि नाशिककरिता घोषणा
देशात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु असताना शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास, नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा करण्यात आलेली असून नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय केवळ पेन्शन किंवा व्याज इतकीच मिळकत असलेले ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आली आहे. पण सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून ती संरचना ‘जैसे थे’ आहे.