नवी दिल्ली : सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (ICAI) नोव्हेंबर महिन्यात अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAI च्या icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन सीए परीक्षांचा जाहीर झालेला निकाल पाहता येईल.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने आज सोमवारी सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यात अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ICAI च्या वरील अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन उमेदवारांना सीए परीक्षांचा जाहीर झालेला निकाल पाहता येईल.या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन उमेदवारांना सीए परीक्षांचा जाहीर झालेला निकाल पाहता येईल.
गतवर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४ लाख ७१ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १ हजार ०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना कोरोनामुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत महिन्यात आणखी एक संधी देण्यात आली होती.
* असा पहा सीएचा निकाल
– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा.
– ‘CA final result link‘ लिंक वर क्लिक करा.
– यानंतर विचारलेली माहिती समाविष्ट करा.
– माहिती भरल्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.