पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने संतापले. राज्यपालांनी अंत पाहू नये, असं ते म्हणाले. ‘राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, अंत पाहू नये’, असं ते म्हणाले.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.