मुंबई : नाट्यसंपदाच्या विजया प्रभाकर पणशीकर यांचं वृद्धापकाळाने काल गुरूवारी रात्री निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. विजया पणशीकर यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या पश्च्यात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंड असा परिवार आहे. विजया पणशीकर यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते.
नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेची १९६३ ला स्थापना झाली. या संस्थेने ‘अमृत झाले जहराचे’ आणि ‘मोहिनी’ ही नाटके रंगमंचावर आणली.
नाट्यसंपदेच्या विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं असून गुरुवारी (४ फेब्रुवारी) रात्री १.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. विजया पणशीकर यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती.
नाट्यसंपदा संस्थेने ‘अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ‘मोहिनी’ अशी दोन नाटके रंगमंचावर आणली त्यानंतर ‘मला काही सांगायचंय’, ’इथे ओशाळला मृत्यू’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशी अनेक नाटकं गाजली. त्यांच्या निधनाने नाट्यसंपदा पोरकी झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.