मुंबई : सैराट फेम परश्या म्हणजे आकाश ठोसर एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘1962 – द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये आकाश ठोसर मुख्य भूमिकेत असणार आहे. यात त्याने एका सैनिकाची भूमिका साकारली आहे. आकाशसोबत अभय देओल, सुमित व्यास असे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, ही वेब सीरीज 26 फेब्रुवारीला डिजनी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे.
सैराट तुम्हाला चांगलाच आठवत असेल आणि त्यातली परश्या आणि आर्ची ची जोडी सुद्धा. या चित्रपटाने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होत आणि त्या वेळी सर्वांच्या तोंडी फक्त ‘ झिंग झिंग झिंगाट’ एवढचं ऐकू यायचं. ह्या चित्रपटात ‘परश्या’ ची भूमिका करणारा आकाश ठोसर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. तोच आकाश आता एका नव्या वेब सीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ 1962 – द वॉर इन द हिल्स ‘ ह्या वेब सीरीज मध्ये आकाश ठोसर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याने यात एका सैनिकाची भूमिका साकारली आहे. ह्या भूमिकेसाठी आकाशने भरपूर मेहनत घेतली असून त्याचा नवीन लूक प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडत आहे. सिनेमा एक्सप्रेसने ह्याबाबत वृत्त दिलं आहे. त्याचा सैनिकाच्या गणवेशातील लूक सोशल मीडियावर त्याचे चाहते भरपूर प्रमाणात शेअर करत आहेत. आकाशसोबतच अभय देओल, सुमित व्यास यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार ह्या वेब सीरीज मध्ये पाहायला मिळतील.
ही वेब सीरीज 26 फेब्रुवारीला डिजनी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. ह्या वेब सीरीज ची कथा ही 1962 च्या Indo-china युद्धावर आधारित आहे. 125 भारतीय सैनिकांची फौज ही 3000 चिनी लोकांविरूद्ध कशी उभी ठाकली त्या शौर्य व पराक्रमाची कहाणी आपल्याला ह्या वेब सीरीज मधून पहायला मिळेल. वेब सिरीजच्या ट्रेलरला सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
” मी लहान असल्यापासून भारतीय सैन्यात भरती होण्याचे माझे स्वप्न होते आणि मी चित्रपटांत येण्यापूर्वी दोनदा स्पर्धा परीक्षा देखील दिल्या आहेत. जर मी आज अभिनेता नसतो तर माझ्या कारकीर्दीत आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील होणे निश्चित होते.”
आकाश ठोसर – अभिनेता