सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे (वय 62, सोलापूर, सोसायटी पंखा बावडी) यांचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहेत.
भगवान शिंदे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ती घरीच परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरून खाली पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. ही माहिती वा-यासारखी पसरली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आणि रेल्वे हॉस्पिटलला हालवले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. नातलगांनी शोधाशोध केल्यानंतर सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालयात अनोळखी मृतदेह आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर हा मृतदेह भगवान शिंदे यांचा असल्याची खात्री पटली आहे.