सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत पुन्हा एकादा वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिध्द बुळा याने शिवाचार्य यांचा जातीचा बनावट दाखला तयर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं आहे. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करुन ते सामाजिक कार्यात सहभागी झाले. सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मितीही त्यांनी केलीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासदारकी वाचवण्यासाठी खासदार महोदयांनी आता जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे. अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता. शिवसिद्ध बुळा या व्यक्तीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा बनावट दाखला तयार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांचा पराभव खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केला होता. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मत मिळवून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडून आले होते.