प्रयागराज : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये होत्या. मौनी अमावस्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी संगम येथे सामान्य भाविकांप्रमाणे गंगास्नान केले. प्रयागराजमधील संगमावर आज माघ महिन्यातील मेळ्याचे तिसरे स्नानपर्व आहे.
मौनी अमावस्येच्या निमित्ताने मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. गंगा संगमावर स्नान केल्यानंतर प्रियंका गांधी मनकामेश्वर मंदिरात जाऊन देखील दर्शन घेणार आहेत. याठिकाणी त्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घेतली.
उत्तर प्रदेशात मौनी अमावस्यानिमित्त श्रद्धाळू पवित्र स्नान करत आहेत. गुरुवारी सकाळपासूनच पवित्र नद्यांच्या काठावर भाविकांची गर्दी वाढली आहे. संगम शहर प्रयागराज असो, बाबा विश्वनाथ यांची नगरी काशी किंवा भगवान श्री रामांची अयोध्या असो, सर्वत्र भक्त मोठ्या संख्येने पोहोचून स्नानासोबत दान करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मौनी अमावस्यानिमित्त राज्य सरकारने प्रयागराजमधील संगमसमवेत माघ मेळा साइटवर हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर पुष्पवृष्टी केली आहे. गुरुवारी, लोक मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील नद्यांच्या काठावरील घाटांवर पवित्र स्नान करीत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्थान केलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा आपलासा करू इच्छित असल्याच्या प्रतिक्रिया यायानंतर उमटत आहेत.
याठिकाणी स्नान आणि पूजा केल्यानंतर त्यांनी नाव देखील चालवली. याचाही एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्या नाव चालवत आहेत. ज्यामध्ये ती दोन्ही हातांनी बोटीवर बसताना दिसत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रियंका गांधी बोटीवरुन संगमला जात असताना, योगी सरकार त्यावेळी हेलिकॉप्टरमार्गे माघ जत्रेत उपस्थित यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव करीत होते. प्रियंका गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांवरही या फुलांचा वर्षाव झाला. फुलांचा हा पाऊस केवळ एकट्या प्रियंकासाठीच नाही तर आज मौनी अमावस्यानिमित्त माघ जत्रेत आलेल्या लाखो भाविकांसाठी करण्यात आला आहे.