तामिळनाडू : तामिळनाडूमधील फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट झाला आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 36 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. विरुधुनगरमधील ही घटना आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
तामिळनाडूतील विरुधनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट झाला असून या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 36 जण जखमी झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या फॅक्टरीत फटाके बनविण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स एकत्र केले जात होते. त्याच वेळी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की काही अंतरावरील घरांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर काही वेळातच अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. मोठ्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात दलाला यश आले. मात्र तोपर्यंत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या आागीत 36 जण भाजले असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख व गंभीर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तामिळनाडूतील या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधांनांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.