मुंबई : पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूसंबधीच्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्यानंतर भाजपचे नेते शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, इतक्या सगळ्या गदारोळानंतरही संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पूजा चव्हाणच्या बहुतांश पोस्टमध्ये ती आनंदीच दिसते. मात्र, आपण सुरुवात करुया, 23 डिसेंबरच्या तिच्या पोस्टपासून कारण, इथे ती आनंदी दिसते. आयुष्यात जिद्द ठेवण्याचं सल्ला ती देते. यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, जिद्द ठेवा, आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. मात्र, असं म्हणणारी पूजा चव्हाणच टोकाचं पाऊल उचलेल असं यावेळी कुणालाही वाटलं नसेल.
गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून संजय राठोड यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, संजय राठोड यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे आता संजय राठोड आपले मौन नक्की कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.
भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
* ठाकरे सरकारवर दबाव वाढला
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात संजय राठोड यांचं घेतलं जाणारं नाव आता उघडपणे घेतलं जात आहे. त्यामुळेच संजय राठोड प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
* पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्र्याचे कनेक्शन ?
परळीच्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. यात विदर्भातल्या एका मंत्र्याचं कनेक्शन असल्याची चर्चा आहे. यावरुन भाजपचे अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर संबंधित मंत्र्यांसाठी भातखळकरांनी ‘राठोडगिरी’ असा शब्द वापरला आहे. दरम्यान, पुजानं प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.