वाशिंग्टन : अमेरिकेत एक भीषण अपघात झाला आहे. टेक्सासमधील हायवेवर झालेल्या या अपघातात १०० पेक्षा जास्त वाहने एकमेकांना धडकली आहेत. यामध्ये एक डझनहून जास्त सेमी-ट्रॅक्टर ट्रेलर होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या भागात बर्फवृष्टीही झाली होती. त्यामुळे रस्ता धोकादायक झाला होता.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातात १०० वाहनांची धडक झाली. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे म्हटले जाते. या अपघातात सहाजण ठार झाले असून अनेकजण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यातून हा अपघात झाला असल्याचे म्हटले जाते.
हा अपघात काल गुरुवारी सकाळी फोर्ट वर्थमधील इंटरस्टेट ३५ वेस्टमध्ये झाला. या भागात सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. फोर्ट वर्थ अग्निशमन दलाने या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती दिली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनाही जखमींना मदत करणे कठीण जात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रस्ते निसरडे झाल्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मदत आणि बचावकार्यासाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आणि वाहतूक इतरत्र वळवण्यात आली. या भागातील तापमानाचा पाराही घसरला होता. त्यामुळे वाहनांमध्ये अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढणे आवश्यक होते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १०० वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक डझनहून सेमी-ट्रॅक्टर ट्रेलर होते. अपघाताचे काही छायाचित्र मन हादरवून सोडणारे होते.
घटनास्थळापासून जवळपास ८ मैल अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला. अपघाताच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, तापमान अतिशय कमी असल्याने आद्रताही अधिक होती. त्यामुळे रस्ता अधिक निसरडा आणि धोकादायक झाला होता.
अनेक वाहनांची जोरात धडक झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण जात आहे. वाहने समोरा-समोर धडकली असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्ता इतका निसरडा होता की वाहने पूर्ण फिरली असावीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.