नवी दिल्ली : विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे. आज 15 फेब्रुवारी दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे. https://iocl.com/Products/IndaneGas. aspx या वेबसाईटला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता.
LPG सबसिडीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती. आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 694 रुपयांना मिळत होता. पण आता पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
14 फेब्रुवारीला रात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर नव्या दरात उपलब्ध होणार आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपये असणार आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची घोषणा करत असते. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.