जळगाव : पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथे घडला. धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन हा मालवाहू ट्रक जात होता. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील 15 मजूर जागीच मूत्यूमुखी पडले. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला.
शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय 30 रा फकीर वाडा रावेर), सरफराज कासम तडवी (वय 32 रा के-हाळा), नरेंद्र वामन वाघ (वय 25 रा आभोडा) , डिंगबर माधव सपकाळे (वय 55 रा रावेर) , दिलदार हुसेन तडवी (वय 20 आभोडा), संदीप युवराज भालेराव (वय 25 रा विवरा) , अशोक जगन वाघ (वय 40 रा आभोडा) , दुर्गाबाई संदीप भालेराव (वय 20 रा आभोडा ), गणेश रमेश मोरे (वय 05 वर्ष रा आभोडा) शारदा रमेश मोरे (वय 1.5 वर्ष रा आभोडा), सागर अशोक वाघ (वय 03 वर्ष रा आभोडा ), सुमनबाई शालीक इंगळे (वय 45 रा आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (वय 45 रा आभोडा ) , सबनुर हुसेन तडवी (वय 53 रा आभोडा) असे मृतांची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील 15 मजूर जागीच मृ्त्यूमुखी पडले. या ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.
मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील अभोडा केराळे व रावेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.