अमरावती : आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याची आयुष्यभराची कमाई मातीमोल ठरली आहे. कृष्णा जिल्ह्यातील बिजली जमालय्या असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी ५ लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्या आहेत. बिजली जमालय्या हे डुकरांचा व्यापार करतात. आपल्या कमाईचे नुकसान झाल्याने त्यांना प्रचंड दुःख झाले.
आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई असलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्याने आता मातीमोल ठरल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती. बिजली जमालय्या असे त्याचे नाव असून, तो डुकरांचा व्यापार करतो. त्यातून होणारी कमाई तो बँकेत ठेवण्याऐवजी घरातील एका पेटीत ठेवत असे. त्यातून जमा झालेल्या पाच लाख रुपयांतून या व्यापाऱ्याला नवे घर बांधायचे होते.
नोटांना वाळवी लागून त्या मातीमोल ठरल्याचे पाहताच बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याला प्रचंड दु:ख झाले. त्याने या खराब नोटा गावात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना वाटून टाकल्या. लहान मुलांच्या हातात इतकी मोठी रक्कम बघून गावातील मंडळींनी पोलिसांना ही माहिती कळविली. वाळवीने खाल्लेल्या या नोटा बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याने मुलांना दिल्या, असे चौकशीतून निष्पन्न होताच सारा प्रकार उजेडात आला.