मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला लगावला. ‘गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय’, असे शेलार म्हणाले.
गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल शुक्रवारी नवी मुंबईत केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय,” असं म्हणत शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेवर निशाणा साधला.
गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील.
जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!
* गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, अधिवेशनात विषय मांडणार – सुळे
महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचं उत्तर द्यावं. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुळे म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते.