सोलापूर : सोलापुरात गॅलेक्सी स्पा अँड वेलनेस या मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. येथील भागवत थिएटर परिसरात महिन्याभरापूर्वी हे पार्लर सुरू झाले आहे.
पोलिसांनी मिझोराम व नागालँड येथून आलेल्या 7 मुलींसह 10 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मालक अनिल जाधव (रा. अशोकनगर, विजापूर रोड, सोलापूर) व विशाल कांबळे (रा. जत, जि. सांगली) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मॅनेजर सागर सुनील शिरसोडे (वय 26, रा. सिद्धेश्वरनगर, मजरेवाडी) व कामगार परशुराम दत्तात्रय वाघमारे (वय 20, रा.सिद्धेश्वर पार्क, जुळे सोलापूर) यांना अटक केली आहे.
शहरात नागरी वस्त्यांमध्ये काही ठिकाणी छुपे वेश्या अड्डे सुरू आहेत.याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली. त्याठिकाणी वेश्या अड्डा सुरू असल्याची खात्री झाली. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास या मसाज पार्लरवर छापा टाकला. छाप्यावेळी पोलिसांना पार्लरमध्ये मिझोरम व नागालँड येथून आलेल्या 7 मुली आढळून आल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यातील दोन महिलांना पोलिसांनी ग्राहकांसोबत रंगेहात पकडले. भरवस्तीत पार्लरच्या नावे सुरू असलेला हा वेश्या अड्डा चव्हाट्यावर येताच शहरात एकच खळबळ उडाली. कारवाईदरम्यान बघ्यांचीही गर्दी झाली होती. पैशाच्या आमिषाने मसाजचे काम देऊन परराज्यांतून आणलेल्या मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या सात मुलींची पोलिसांनी सुटका केली.
* भागिदारीत चालू होता मसाज पार्लर
भागवत थिएटर परिसरात पहिल्या मजल्यावर महिन्यापूर्वी अनिल जाधव व विशाल कांंबळे यांनी भागिदारीत गॅलेक्सी स्पा अँड वेलनेस हे मसाज पार्लर सुरू केले होते. त्यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला होता. त्यासाठी मिझोरम, नागालँड येथून सात मुली आणल्या आहेत.
याप्रकरणी मालक अनिल जाधव व विशाल कांबळे, मॅनेेजर सागर सुनील शिरसोडे, सफाई कामगार परशुराम वाघमारे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. शिरसोडे व वाघमारे या दोघांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.