सोलापूर : केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतुक करण्यात येते. गडकरी यांनी देशातील रस्त्यांच्या कामातून स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. याची प्रचिती सोलापुरात आली. पुन्हा एकदा गडकरींच्या नेतृत्त्वात सोलापूर-विजापूर महामार्गवरील रस्ते बांधकामाने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रबंधक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे सर्व प्रतिनीधी आणि परियोजना अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. तसे ट्वीटही केले.
सरकारी काम खूप धिम्या गतीने असतं, याचा अनुभव समस्त भारतीयांना आहे. पण भारतीयांच्या याच मानसिकतेला छेद देणारी एक बातमी समोर आली आहे. सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका 25 किमी रस्त्याचं काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते विजापूर दरम्यान 110 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे.
हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर 25.54 किमीचा रस्ता केवळ 18 तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे. यासाठी 500 मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचं आणि 500 कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सोलापूर ते विजापूर या महामार्गावार 110 किमीचं काम सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता चौपदरी असून दळणवळाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरणार आहे. याच रस्त्यावरील 25.54 किलोमीटर लांबीचा एक पदरी रस्ता अवघ्या 18 तासात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची नोंद लिम्बा बुक ऑफ रिकॉर्डमध्ये केली जाणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.
हा महामार्ग ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH52 म्हणून ओळखला जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहेत.
* 500 कर्मचा-यांचे परिश्रम
हा रस्ता बनवण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले आहे. या कर्मचाऱ्यांसह मी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना प्रबंधक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे सर्व प्रतिनीधी आणि परियोजना अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असे गडकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोलापूर-विजापूर राज्यमार्गाच्या 110 किमीचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होईल, असे गडकरींनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.
सोलापूर-विजापूर हा महामार्ग पूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जायचा तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडला जाणारा रस्ता एनएच 52 नावाने ओळखला जायचा. सोलापूर आणि विजापूर चौपदरीकरणादरम्यान येथे बायपास रस्ते काढण्यात येणार आहे. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूल सुद्धा असणार आहे.