हैदराबाद : तेलंगणात एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका खून प्रकरणात पोलिसांनी चक्क कोबंड्यालाच कस्टडीत घेतले आहे. ही घटना जगतियाल जिल्ह्यातील आहे. येथे सोमवारी येल्लम्मा मंदिरात कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ सुरू होता. याच वेळी एका कोंबड्याने 45 वर्षीय टी. सतीश यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
या कोंबड्याच्या पायाला एक चाकू बांधलेला होता. याचा थानुगुला सतीश यांच्या पोटाच्या खालच्या भागावर घाव बसला. ही घटना 22 फेब्रुवारीला लोथुनूर या गावात घडली. येथे कोंबड्यांच्या अवैध झुंजीचा खेळ सुरू होता. पायाला चाकू बंधला असल्याने कोंबडा फडफडू लागला. याच दरम्यान कोंबड्याच्या पायाला बांधलेल्या चाकूने 45 वर्षीय सतीश यांच्या पोटाखालचा भाग कापला गेला. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अवैधरित्या झुंजी
कोंबड्यांच्या झुंजीवर तेलंगणात बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, येल्लम्मा मंदिरात अवैधरित्या याचे आयोजन करण्यात आले होते. घटनेच्या चौकशीनंतर पोलिसांनी संबंधित कोंबड्याला गोल्लापल्ली पोलीस ठाण्यात नेले आहे. येथे त्याला पोलिसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी या कोंबड्याच्या खाण्याचीही व्यवस्था केली आहे.
* पोलिसांनी नाकारले
कोंबड्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पोलिसांनी हे नाकारले आहे. गोल्लापल्लीचे एसएचओ बी. जीवन यांनी स्पष्ट केले आहे, की ना कोंबड्याला अटक करण्यात आली आहे, ना त्याला डिटेन करण्यात आले आहे. मात्र, पोलीस या कोंबड्याला न्यायालयासमोर हजर करणार आहे. न्यायाधिशांच्या आदेशानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.