सोलापूर : मोटरसायकलवरून मित्रासमवेत नळदुर्गहून सोलापूरकडे येत असताना अणदूरजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने डॉक्टराचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
विकासकुमार मीना (वय-२१) असे मृताचे नाव आहे. ते सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून सेवेत होते. ते जागीच ठार झाले तर त्यांच्यासमवेत असलेले दुसरे डॉक्टर हे जखमी झाले. या घटनेची हकीकत अशी की, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नळदुर्ग येथील किल्ला पाहण्यासाठी मित्र डॉ.किशोर कुमार पोखरण यांच्यासमवेत गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या मित्राच्या मोटरसायकलवरून पाठीमागे बसून सोलापूरकडे येत असताना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अणदूरजवळ समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एम.एच.१४.बीटी ३४८१) ने समोरून धडक दिली. यात मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले डॉक्टर मिना हे उडून एसटीच्या चाकाखाली गेले तर मोटरसायकल चालवणारे दुसरे डॉ.किशोर कुमार पोखरण (वय-२१) हे उडून बाजूला पडले जखमी अवस्थेत पडले.
दोघांनाही मित्र डॉ. राहुल भारदे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच डॉक्टर मीना हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर डॉक्टर किशोर कुमार पोखरण यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली. या दुर्दैवी घटनेमुळे सिव्हिल रुग्णालय परिसरात मित्र वर्गांनी हळहळ व्यक्त केली. ते गुरुनानक चौकातील डॉक्टरांच्या होस्टेलमध्ये राहत होते.