मुंबई : गेल्या २ आठवड्यांची तुलना केल्यास राज्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली आहे. एकूण १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कायम असल्याचेही ते म्हणाले. या २४ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी करणे हेच आपल्या पुढील लक्ष्य असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यात आज 51880 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 65934 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4107092 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 641910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.16% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 4, 2021
राज्यभरात मोठ्या प्रमाणवर चाचण्या सुरू असून त्या मुळीच कमी झालेल्या नसल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या राज्यात अडीच लाख ते २ लाख ८० हजारापर्यंत दररोज करोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या कायम असल्याचेही ते म्हणाले. या २४ जिल्ह्यांमधील करोना रुग्णसंख्या कमी करणे हेच आपल्यापुढील लक्ष्य असल्याचे टोपे यांनी सांगितले.
तीन दशकांनंतर गोकुळ दूध संघात परिवर्तन, लगेच 2 रुपये दूध दरवाढीचा निर्णय https://t.co/LNFV5aQdPg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर गप्प' https://t.co/os5syWQ93F
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
कोरोना चाचण्यांची संख्या कमी झालेली नसतानाही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याचे टोपे म्हणाले. राज्यात रुग्णवाढीबरोबरच पॉझिटिव्हीटीचा दर, मृत्यूदर देखील कमी होत असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८४.०७ टक्के इतका असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८ टक्के आहे. हे पाहता राज्याचा रुग्णबरे होण्याचा दर हा देशाच्या रुग्ण बरे होण्याच्या दराहून अधिक असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
मराठा आरक्षण : उद्या अंतिम निकाल येणार #surajyadigital #MarathaReservation #results #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/7B8CZBwh8m
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजन लीकेज थांबवणे गरजेचं आहे, असे टोपे म्हणाले. राज्याने केंद्र सरकारकडे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला २० हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील असे दिसते. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलेले आहे. काही दिवसात सुमारे साडेतीन लाखांपर्यंत रेमडेसिवीर उपलब्ध होतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश दिले आहेत,४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 4, 2021