सोलापूर : मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील प्रसिद्ध चिवडा व चहाचे नामांकित हॉटेल जय शंकरचे सर्वेसर्वा तथा अनेक पुरस्कारांनी सन्मानित यशस्वी महिला उद्योजक रुक्मिणी शंकर खताळ यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
आधारकार्ड नसलेल्यांचं लसीकरण होणार का?, मुंबईच्या महापौर म्हणाल्या… https://t.co/dYukVQzF8T
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
जि. प सदस्य कै. तानाजी खताळ यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचा 1 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. हा सर्वात मोठा धक्का खताळ कुटुंबीयांस बसला होता. त्या धक्क्यातून अजूनही हे कुटुंब सावरलेले नाही अशातच हॉटेल जय शंकरच्या प्रमुख सर्वेसर्वा रुक्मिणी खताळ यांचं सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने आज मंगळवारी निधन झाले.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन
https://t.co/yKlLb5ScnV— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रुक्मिणी खताळ यांनी मोठ्या मेहनतीने सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावाजवळ एका लहान टपरीमध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला होता. चहासोबतच साखर घालून खवा त्या देत होत्या या रस्त्यावर जाणारा येणारा प्रत्येक जण रुक्मिणी माईंचा चहा पिण्यासाठी थांबत असे. त्यानंतर त्यांनी हॉटेल ‘जय शंकर’ काढले या ठिकाणी त्या चिवडा विकू लागल्या. हा चिवडा या महामार्गावर लांबोटी चिवडा म्हणून प्रसिद्ध आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीत विजयी, पराभूत झालेले नेते काय म्हणतायत ? https://t.co/zcUi7TgKAm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
जो कोणी या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी थांबतो तो लांबोटी चिवडा आणि त्या ठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या चटण्या आवर्जून घेऊन जातो. अशा या प्रसिद्ध आणि मोठ्या कष्टाने उभा राहिलेल्या उद्योजिका रुक्मिणी खताळ यांच्या निधनाने संपूर्ण मोहोळ तालुक्यावर हळहळ व्यक्त होत आहे.
लग्नात कोरोनाची भीती, नवरदेव-नवरीने काठीने घातल्या वरमाला https://t.co/VEz8lzXG7y
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021