नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला, अशी बातमी आज सर्वच माध्यमांमध्ये झळकली. मात्र या बातमीचे एम्स रुग्णालयाने खंडन केले आहे. दिल्लीतल्या एम्समध्ये छोटा राजनवर अजूनही उपचार सुरु आहेत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीत जेलमध्ये असताना छोटा राजनला कोरोनाची लागण झाली होती. त्याला 26 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. छोटा राजनला तिहार तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक दिवस त्याची प्रकृती अस्थिर होती, दरम्यान आज शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.
पोलिस आयुक्तांनी वेषांतर करुन केली पोलीस ठाण्याची झाडाझडती, होतंय कौतुक https://t.co/rLUbLCbQmv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
गेल्या काही दिवसांपूर्वी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला बरी केली होती. तिहार तुरुंग आणि दिल्ली पोलिसांकडून अद्याप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूसंबंधित अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एम्सनेही अधिकृत स्वरुपात या बातमीची पृष्टी केलेली नाही. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुरुंगात असतानाही अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रात या दहा जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पाऊस #rain #surajyadigital #मुसळधार #पाऊस #महाराष्ट्र #Maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/UsJDdXFWog
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021