सोलापूर : सोलापुरात आज सकाळी सोलापूर – विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हे फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. हा जमाव हटवण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.
औरंगाबाद : नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम, नातेवाईकच बनतायात 'सुपर स्प्रेडर' https://t.co/3Mus0FqO4r
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
हा मासे घेऊन येणारा ट्रक विजापूरहून सोलापूरकडे येत होता. रस्त्याच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजुबाजुच्या परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे हे मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. घाणीतली मासे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकजण त्या घाणीत उतरत होता.
सोलापूर : आठ दिवसांचा भाजीपाला घेण्यासाठी मंडईत झालेली गर्दी #solapur #सोलापूर #सुराज्यडिजिटल #गर्दी #मंडई #surajyadigital #8DAYShttps://t.co/B4Bu9OHinM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोकांनी पिशव्या भरून मासे पकडले. यासाठी ऐन कोरोना उद्रेकात एवढ्या मोठ्या संख्येने तलावाच्या चिखलात उतरण्यासही हे नागरिक मागे पुढे पाहत नव्हते. ही झुंबड पाहण्यासाठी तलावाबाजुला असलेल्या पुलावरून पाहण्यासाठी गर्दी झाली होती. येणारा जाणारा प्रत्येकजण खाली डोकावून काय चाललेय हे पाहत होता आणि पुढे जात होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना पोलिस हुसकावून लावले.
विजापूर रोडच्या पूलावर मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, घाणीत पडलेले मासे घेण्यासाठी गर्दी #सुराज्यडिजिटल #fish #Solapur #surajyadigital #मासे #truck pic.twitter.com/3rTILSZqyN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021