सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्शन ड्यूटीला गेलेल्या शिक्षक प्रमोद माने यांच्यासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब संसर्गाने बाधित झाले व बघता बघता त्यांच्यासह त्यांचे आई-वडील, मावशी आशा चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. माने कुटुंबातील आई, वडील, मुलगा व मावशी असा चौघांचा सलग चार दिवसांत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
म्यूकोर्मिकोसिसशी नावाचा आला आजार, ४०% पेक्षा जास्त मृत्यूचा धोका, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://t.co/4a4aUaPLpU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
इलेक्शन ड्युटीलाच गेलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणीचिंचाळे या शाळेचे प्राथमिक शिक्षक अशोक माने (रा. मेडशिंगी) यांनाही कोरोना संसर्ग होऊन उपचार सुरु असताना सांगोला येथे मृत्यू झाला. निवडणूक कामी कर्तव्य वर गेलेल्या या शिक्षकांवरती व त्यांच्या कुटुंबावरती ओढवलेल्या संकटामुळे सर्व प्राथमिक शिक्षकातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. या कुटुंबाना निवडणूक आयोगाने व शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा सर्व शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
निवडणुका पार पडल्यापासून शहरांमध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर झालं आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार, नाशिकमध्ये 22 मे पर्यंत वाढवला, कोल्हापुरात लवकरच घोषणा #surajyadigital #कोल्हापूर #नाशिक #lockdown #सुराज्यडिजिटल #Maharashtra #लॉकडाऊन pic.twitter.com/wTXvE5NXhm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
अधिक माहितीनुसार, घेरडी (ता. सांगोला) येथील प्राथमिक शिक्षक प्रमोद वसंतराव माने हे घेरडी अंतर्गत जगधनेवस्ती येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात इलेक्शन ड्यूटीला गेले होते. ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी ड्यूटीवर गेले होते. मतदान प्रक्रियेचे काम संपवून घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांना त्रास जाणवू लागला. पण तब्येत आणखी खालावल्याने त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण #salmankhan #सलमान #खान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #Arpita #aloevera pic.twitter.com/P1L1JDPixM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईतही प्रमोद यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर त्यांची कोरोनाशी झुंज संपली आणि मृत्यू झाला. या सगळ्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यांच्या घरात पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही लागण झाल्यानं सगळ्यांवर उपचार सुरू होते. पण कोरोनाच्या या संसर्गापुढे आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. माने यांच्या कुटुंबातील सगळ्यांचाच मृत्यू झाला.
उजनीने गाठला तळ, शेतक-यांवर ओढवणार जलसंकट
https://t.co/0YKGBPvfNV— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
प्रमोदच्या संपर्कामुळे घरात वडील सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव माने, आई शशिकला माने, मावशी जया घोरपडे व प्रमोदची पत्नी, मुलगा असे पाच जण एकाच वेळी कोरोनाबाधित झाले होते. दैव एवढ्यावरच थांबले नाही तर वडील वसंतराव माने व मावशी जया घोरपडे यांचाही संसर्ग बळावल्याने त्यांचेवरही उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान दोघांचेही निधन झाले. प्रमोद यांची आई शशिकला माने, प्रमोद यांची पत्नी व मुलावरही उपचार चालू होते. मात्र गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देताना शुक्रवारी आई शशिकला माने यांचाही मृत्यू झाल्याने घरातील कर्ती माणसं गेल्याने माने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रमोद माने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बंधू डॉ. प्रवीण माने, भावजई असा परिवार आहे. डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने कुटुंब नि:शब्द झाले आहे. दरम्यान, प्रमोद माने यांची पत्नी व मुलगा कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
मोठा दिलासा; आज राज्यात 61,607 रूग्ण झाले कोरोनामुक्त #coronavirus #कोरोनामुक्त #surajyadigital #दिलासा #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/joPvB4KTs7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
प्रमोद माने हे पत्नी व मुलासह घेरडीअंतर्गत शिवशंभू नगर, तर वडील, आई व मावशी गावातील शिवाजी चौकात एकत्र राहत होते. त्यांचे बंधू डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने मुंबईत राहतात. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही घरे कुलूपबंद असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
कोरोनाच्या या आजारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं खरं पण यात पंढरपूर पोटनिवडणूकही कारण ठरली. आधीच हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यात निवडणुकांच्या कामासाठी वारंवार होणाऱ्या बैठका, नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्याने तो आणखी बळावला. त्यात निवडणुकीचं काम म्हटलं की गर्दी आलीच. यावेळी सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आला. त्यामुळे धोका आणखी वाढला.
हत्तूरच्या माजी सरपंचाने गोळी झाडून केली आत्महत्या https://t.co/dQJ7boiXMY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021