नवी दिल्ली : कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीबीएसई आणि सीआयएससीई यांना बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशा सूचना कोर्टाने द्याव्यात, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही बोर्डाने बारावीची परीक्षा लांबणीवर टाकली आहे. तसेच योग्य वेळी परीक्षा घेतल्या जातील, असे जाहीर केले आहे. मात्र देशात कोरोनाचे संकट वाढत आहे.
टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन, पद्म भूषण इंदू जैन यांचं निधन https://t.co/1uuqzXe2F9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. सर्व बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच, सीबीएसई 12 वीची बोर्ड परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वस्तुनिष्ठ पध्दतीच्या लॉजिकनुसार जाहीर करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता 12 वीची परीक्षा 4 मे ते 14 जून दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र, कोविड 19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
#saveboardstudents #cancelboardexams2021 #cancel12thboardexams2021
Plz understand the feeling of 12th students and plz cancel cancel 12th board exam 2021 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼— lakshy (@cr7_lakshya) May 15, 2021
दुसरीकडे, सीबीएसईने शुक्रवारी बारावीच्या परीक्षांबाबतच्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचे खंडन केलं आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बोर्ड बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची शक्यता आहे.
honorable
Rupani sir>please try to understand 12th students situation.🙏🏻🙏🏻🙏🏻
sir,
>please cancel 12th gujaratboard exams.@vijayrupanibjp @CMOGuj @imBhupendrasinh #CancelGujaratExam #JusticeForStudents #Allpasspolicy #cancelboardexam2021 pic.twitter.com/H2dtKS5msL— chirag chaudhary (@chigs1907) May 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इयत्ता 12 वीच्या परीक्षेसंबंधीच्या माध्यमांच्या वृत्तांना उत्तर देताना सीबीएसईने म्हटले आहे की, “सीबीएसईने बारावीच्या परीक्षांसंदर्भात असे कोणतेही निर्णय घेतले नसल्याचे स्पष्ट केल जात आहे. जर असा निर्णय झाला तर अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने असे सांगितले होते की 1 जून रोजी महामारीचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत चर्चा करतील.
#cancelboardexam#CBSE
Most unlucky batch 2020-21….12thNO OFFLINE FEELING…..
NO TEACHERS DAY CELEBRATIONS..
NO FAIRWELL…
NO FIXED DATE FOR EXAMS…..
NO ENJOYMENT…….Plzzzzz cancle exams we r not able to control stress n all……We all could just blast 🌋🌊😫😤🌋 pic.twitter.com/ebgcntQlYv
— 🌦️ꀷꂦꈤ'꓄🌟ꀘꈤꂦꅐ🌦️ (@AnushkaUmate) May 15, 2021
शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “4 मे ते 14 जून या कालावधीत होणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा नंतर घेतल्या जातील. 1 जून रोजी मंडळामार्फत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि नंतर तपशील जाहीर केला जाईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटीस दिली जाईल.”
भारतात स्पुटनिक – व्ही लसीचा पहिला डोस दिला, लसीच्या किंमतीची झाली घोषणा https://t.co/uEZOmarVcL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
यापूर्वी CBSE इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेत बोर्ड परीक्षा रद्द करण्याची विनंती करत हॅशटॅग #saveboardstudents या नावाने ऑनलाईन मोहीम सुरू केली होती. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी Change.org वर एक याचिका देखील दाखल केली आहे, ज्यामध्ये सरकारकडे 12 वी वर्ग बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केलीय.
Save 12th standard students. We need to live. We can't afford to give up our lives for an exam!!! pic.twitter.com/2P5tjiK8ny
— kirtan pandya (@awesomekirtan) May 15, 2021