मुंबई : म्युकरमायकोसिस आजाराबाबत डॉ. तात्याराव लहाने यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. म्युकर जमिनीतून आपल्या शरीरात जातो. पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असं डॉ. लहाने यांनी सांगितलं.
बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार मागितले https://t.co/8xQXNwsPSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
देशात आता म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचं दिसून येतंय. एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे ब्लॅक फंगसची वाढती रुग्णसंख्या यामुळे देशासमोर दुहेरी चिंता उभी राहिली आहे. म्युकोरमायकोसिस हा आजार हवेतून होतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत वैद्यकीय तज्ञांची मते समोर येत आहेत.
मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना तातडीचा आदेश अशा प्रकारचा उल्लेख तात्काळ हटवा #surajyadigital #Modi #Sarkar #मोदी #socalmedia #socal #media #सोशलमीडिया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0qwyXWzEvQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
यातच डॉ. तात्याराव लहाने यांनी यासंदर्भात वृत्तवाहिनी सांगितलं की, म्युकरमायकोसिस आजार हा म्युकरमुळे होतो. म्युकर हा जमिनीत असतो आणि तो हवेत येऊ शकतो. मात्र आपल्या शरीरात हा हवेतून जातो असं म्हणता येणार नाही, असं लहाने यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना उपचारासाठी गेले पुण्याला, वेळापुरात साडेतेरा लाखांची रोकड चोरीला
https://t.co/XABgCTq4ao— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
म्युकर हवेतून शरीरात जातो असं काही घाबरण्याची गरज नाही. हवेतून शरीरात जाण्यासाठी त्याला मार्ग लागतो. हा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होत नाही. हा आजार संसर्गजन्य नाही, असंही ते म्हणाले.
राज्यात आता 800 जवळपास या आजाराच्या केसेस आहेत. आपल्याकडे राज्यात 110 दवाखाने आहेत, जिथे यावर उपचार केला जातोय. यावर उपचारासाठी इंजेक्शनचं उत्पादन कमी होते कारण तेवढी आधी गरज नव्हती. मॅन्युफेक्चरिंग कमी रुग्ण संख्या वाढली त्यामुळे अडचण जाणवत आहे, असंही डॉ. लहाने यांनी सांगितलं.
ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन https://t.co/fXzxqYLaIK
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
पहिल्या लाटेमध्ये स्टिरॉइड दिले तरी हे रुग्ण आढळले नाहीत आता सुद्धा तेच उपचार देतोय, स्टिरॉइड देतोय. कोव्हिड वायरस म्युटेशन जे झालं आहे, त्यामुळे हा आजार समोर येतोय. सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये म्युकरसाठी पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकोसिस समावेश केला आहे. त्यामुळे दीड लाख खर्च शासनामार्फत उचलला जाईल. पण ज्यांना 5, 7 लाख लागत असतील महाराष्ट्र शासनाकडून शासकीय मदत म्हणून दिली जाणार आहे. इंडस्ट्रीयल ऑक्सिजनमध्ये फंगस असेल तर सगळ्या ऑक्सिजनमध्ये फंगस असायला पाहिजे. त्यामुळे इंडस्ट्रीयल ऑक्सिजन हे याच कारण नाहीये, असं देखील लहाने यांनी स्पष्ट केलं.
आमदार प्रणिती शिंदेंच्या आरोपावर पालकमंत्री पत्रकार परिषदेमधून गेले उठून, इंदापूरच्या पाणीप्रश्नावर पालकमंत्र्यांचे तोंड पडलेhttps://t.co/LaugIBsYSh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021