सोलापूर : सोलापूर शहरातील लॉकडाउन उठविण्यासंदर्भात काल गुरूवारी सायंकाळी शासनाने महापालिकेस स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी काल रात्री उशिरा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर शहर आजपासून अनलॉक झाले आहे. यासाठी व्यापारी, कष्टकरी, कामगारांनी उठाव केला होता.
कोविड आपत्तीमुळे गत दीड महिन्यांपासून कडक लॉकडाउनला सोलापूर शहर थांबले होते. मात्र सोलापूर शहर व्यापारी- लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे आजपासून अनलॉक झाले आहे. याअंतर्गत कोविडविषयक निर्बंधांमध्ये अंशत: शिथिलता मिळणार असून सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे.
शहरात अनलॉक प्रक्रिया राबविण्यासाठी स्वतंत्र युनिटची मान्यता हवी होती. त्यानुसार मनपाने शासनाकडे बुधवारी प्रस्ताव पाठवला होता. गुरुवारी सायंकाळी मनपाला स्वतंत्र प्रशासकीय युनिट घोषित केल्याचे आदेश अप्पर सचिव श्रीरंग घोलप यांनी पाठवले आहेत. त्यामुळे शहरात अनलॉकबाबतचा निर्णय घेण्यास मनपाला अधिकार प्राप्त झाले आहेत, तरीही रात्री उशिरापर्यंत मनपा अधिकारी अनलॉकचा आदेश काढण्यातच व्यस्त होते. उशिरा रात्री आदेश काढले.
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात लॉकडाऊन हटवला, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवला जाणार, लॉकडाऊन संपला, आता नवीन नियमhttps://t.co/FXNhb8AXEO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
शासन निर्देशातील नियम-अटींना अधीन राहून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री सव्वा अकरा वाजता शहर अनलॉक संदर्भातील आदेश काढले. यानुसार शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवण्यास तर, अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या दुकानांतील मालक व कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण बंधनकारक आहे. बँकांच्या कामकाजाची वेळ देखील सात ते दोनपर्यंत राहणार आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे पार्सल सेवेसाठी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.
ई-कॉमर्सअंतर्गत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तूंची घरपोच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुलगा होत नसल्याने पत्नी आणि 3 मुलींना दीड वर्षे ठेवले डांबून, पंढरपुरातील धक्कादायक प्रकारhttps://t.co/tgyLd4eTHb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
कृषी संबंधित दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहतील. यंत्रमाग, गारमेंट, विडी हे उद्योग, मद्य विक्रीची तसेच रेशन दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या उद्योगातील कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण सक्तीचे असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन, भारतीय दंड संहिता व अन्य कायद्यातील कलमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.
18 जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील नाही; उद्धव ठाकरेंचा आदेश, महाविकास आघाडीत निर्णयावरुन गोंधळ https://t.co/WsCEOuvM3i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
* अशी आहे नियमावली
– बिगरअत्यावश्यक सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडणार
– विडी, यंत्रमाग, गारमेंट उद्योग दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार
– मद्य विक्री, रेशन दुकानांनाही दोनपर्यंत मुभा
– बँकांच्या कामकाजाची वेळ सात ते दोनपर्यंत
– हॉटेलविषयक घरपोच पार्सल सेवा दोन ते आठपर्यंत
– अत्यावश्यक कारणाशिवाय दुपारी तीननंतर नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई