पुणे : पुण्यातील (पिरंगुट उरवडे, ता. मुळशी) सव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये 15 महिला कामगारांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे. या कंपनीत सॅनिटायजर बनवले जात असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर करत होते.
पुण्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट येथील केमिकल कंपनीला दुपारी भीषण आग लागली. यातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन दुःख व्यक्त केलं आहे. ‘महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती ‘शोकभावना’, असं मोदींनी म्हटलं.
महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021
मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 18 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
Pained to hear the news of the loss of lives in a fire accident in a factory in Pune. My heartfelt condolences to the bereaved families and prayers for the speedy recovery of the injured.
— Vice President of India (@VPIndia) June 7, 2021
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही शोक संदेश ट्वीट केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला शरद पवार आणि अजित पवार 'वर्षा'वर #varsha #surajyadigital #Thackeray #Pawar #शरदपवार #meet #सुराज्यडिजिटल #Political pic.twitter.com/MXWVeDBMjE
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून कुलिंग काम सुरु असल्याची माहिती आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.
कुत्र्याला वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, सांगलीतील दुर्घटना https://t.co/BXgGnYd89Z
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत. आमदार संग्राम थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 कर्मचारी आग लागली त्यावेळी अडकले होते. त्यामध्ये 15 महिला कर्मचारी आणि 2 पुरुष कर्मचारी यांचा समावेश होता.
“ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल”
संग्राम थोपटे – आमदार