सोलापूर / बार्शी : बार्शीच्या एका तरुणाने फेसबुक इन्स्टाग्रामवर असणारा बग शोधून काढला आहे. मयूर फरताडे असं बग शोधणाऱ्या तरूणाचे नाव आहे. मयूरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. दरम्यान, त्या बदल्यात कंपनीने त्याला २२ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला प्राप्त झाला आहे. तो सध्या कोल्हापुरात शिक्षण घेत आहे.
रामभक्तांना राष्ट्रवादीचे आवाहन #surajyadigital #RamMandir #राममंदिर #सुराज्यडिजिटल #NCP #राष्ट्रवादी
– राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी – जयंत पाटीलhttps://t.co/6QWLSkKIe4— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
नवीन शिकायचे म्हणून वेगवेगळ्या सिक्युरिटी रिसोर्सेसचे लिखाण वाचत होतो. त्यातून इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फिचर्स बघून वेब ॲप आणि अँड्रॉइड ॲपवर टेस्ट करीत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुकचा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसोर्सेस पार्टीसिपेट करू शकतात. इथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केल्याचे मयूर फरताडे याने सांगितले.
$30000 bounty from Facebook
Write-up: https://t.co/teRY3dDqNY#facebook #bugbounty #Instagram #infosec pic.twitter.com/NGU8UjWzAp
— Mayur Fartade (@mayurfartade) June 15, 2021
फेसबुक-इन्स्टाग्रामवर असणारा बग बार्शीच्या मयूर फरताडे याने शोधून काढला. मयूरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीबीएसई 12 वी निकाल, असा आहे 30:30:40 हा फॉर्म्युला, 31 जुलैला होईल निकाल जाहीर https://t.co/6GTNLxz77y
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला ३० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती.
दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, केंद्र सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह https://t.co/UTo5CWPnwM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
सध्या बग बाऊंटी शोधून मोठ्या कंपनींकडून कमाई करण्यात भारतीय हॅकर्स आघाडीवर आहेत. फेसबुकसारख्या कंपन्या आपलं ऍप सुरक्षित ठेवण्यासाठी बग बाऊंटीज देतात. त्यात त्यांच्या ऍपमध्ये असणारे बग शोधून द्यायचे आणि त्या बदल्यात दाबून पैसे त्यांच्याकडून मिळवायचे हे काम हॅकर्स करतात. ज्ञान कधी, कसं, कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
* नेमकी कोणती चूक दाखवून दिली ?
मयूर फरताडे याने त्याच्या कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचविले. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे. बार्शी शहरातील रहिवासी असलेला मयूर हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. तो शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे.
सोलापूर : पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी परिवारासह ग्रामपंचायतीत ठोकला तळ, गुरेही बांधली ग्रामपंचायतीसमोर https://t.co/ukubnoq8lh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021